अंबरनाथच्या सागरचा गॅसवाला ते सिलेंडर मॅन पर्यंत प्रवास

Share Now To Friends!!

 अंबरनाथ : सोशल मीडियावर कधीही कोणीही स्टार होतो आणि त्याचे नशीब पालटते.असेच काहीसे घडले आहे अंबरनाथ मधील सागर जाधव (Sagar Jadhav) या तरूणाबरोबर. गॅस वितरण करत असल्याने गॅसवाला अशी ओळख असलेल्या सागरची शरीर यष्टी पिळदार व भारदस्त. दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत एक तरुणाने त्याचा फोटो क्लिक केला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की आज सागरची ओळख बदलली आहे. गॅसवालाचा तो सिलेंडर मॅन  ( Cylinder Man)  झालाय त्याच्या फोटोला मिळालेल्या लाईक्स कमेंट पाहता तो सध्या एक सेलिब्रिटी झाला आहे. 

सागर हा आंबरनाथ येथील लक्ष्मी नगर परिसरात आपल्या काका, काकू, भाऊ आणि पत्नीसह राहतो. लक्ष्मीनगर परिसरातच असलेल्या भारत गॅसचं गोडाऊन आहे. या ठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करत आहे. आधी सडपातळ असलेल्या सागरने मागील पाच वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन भारदस्त पिळदार शरीरयष्टी कमवली आहे. सकाळपासून 30 किलोचे सिलेंडर अतिशय मेहनत करून, 4 मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन, पायऱ्या चढून, ते लोकांपर्यंत पोहचवून सागर त्याचं घर चालवतो. 

दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नेहमीप्रमाणे गॅस वितरण करणारा सागर दोन दिवसापूर्वी गॅसच्या टेम्पोजवळ उभा असताना एका नेटीझनने त्याच्या पिळदार कसलेल्या शरीर यष्टीला त्याच्याही नकळत आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आणि त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. अगदी काही तासात या फोटोवर लाखो कमेंटचा पाऊस पडला असून प्रत्येकजण त्याच्या पिळदार शरीरयष्टीची मनापासून स्तुती करत आहे. आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे पासून ते प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके ने देखील त्याला कौतुकाची थाप दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे सिलेंडर मॅन अस नामकरण देखील झालंय .

काल पर्यंत गॅसवाला म्हणून त्या परिसरात ओळखल्या जाणाऱ्या सागरला आज अनेकजण सिलेंडरमॅन म्हणून ओळखू लागले  आहे. त्याचा अप्रतिम फोटो पहिल्याचा फोन खणखणू लागताच त्यालाही नवल वाटले. मात्र काल पासून तो अचानक सेलिब्रेटी बनला असून त्याला वेब सिरीज मध्ये किंवा सिरीयल मध्ये काम द्या यासारख्या कमेंट्स येत असल्याने त्याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. कुटुंब ,मित्र पविरात नव्हे तर सागर आता जिथे सिलेंडरची डिलिव्हरी द्यायला जातो तिथले लोकही उत्सुकतेनं आपल्याकडे पाहात असल्याचं सागर सांगतो. त्याच्या सहकाऱ्यांनाही त्याच मोठं कौतुक आहे. सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं. तर याबाबत सागरने नम्रतेने सर्वांचेच आभार मानलेत तसच एखाद्या सिरीयल वेबसिरीजमध्ये काम मिळाल्यास निश्चित करेल असे सांगितले आहे. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment