अजित दादांच्या कार्यक्रमाला गर्दी! राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Share Now To Friends!!

पुणे : पुण्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याची दखल आता पोलिसांनी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके त्यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीबाबत अजित पवारांचा संताप! म्हणाले, वाटलं उद्घाटन न करता निघून जावं, मात्र…  

गर्दीबाबत काय म्हणाले होते अजित पवार 
काल झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले होते की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे. अजित पवार म्हणाले की,  गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकऱ्यांचा हिरमोड झाला असता,  मात्र त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं पवार अजित म्हणाले होते. तुम्ही नियम पाळले नाहीत त्यामुळे मनात खंत वाटते, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले होते.  

Photo : पुण्यात अजितदादांच्या हस्ते कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली

राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती.  कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं होतं. अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. यावर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.  

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment