अनिल देशमुखांचं ईडीला पत्र, आजारी असल्याने ऑनलाईन जबाब नोंदवण्याची विनंती

Share Now To Friends!!

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. मात्र आजही ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. वय जास्त असल्याने आणि काही आजारांनी ग्रस्त असल्याचे कारण त्यांनी सांगितलं आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी ईडीला एक पत्रही लिहिलं आहे. यात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवून घेण्याची विनंतीही केली आहे.

ईडीने अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र आजही ते ईडीसमोर गेले नाहीत. प्रत्यक्ष चौकशीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब देण्याची अनिल देशमुखांची तयारी दर्शवली आहे. माझ वय 72 वर्ष आहे, त्यामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. अनिल देशमुखांचे वकील ईडीकडे कागदपत्रे मागणार आहेत. कागदपत्रे दिल्यास अनिल देशमुख स्वत: ईडी कार्यालयात येतील आणि चौकशीला सहकार्य करतील, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि सुडभावनेने करण्यात आले आहेत. ज्यांनी स्वतः गंभीर गुन्हे केले त्यांचं सांगण्यावरून आणि एक पक्षाच्या राजकारणासाठी केंद्र सरकार राजकीय विरोधक म्हणून कारवाई करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले.

शुक्रवारी ईडीचं धाड सत्र संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. परंतु, शनिवारी दिलेल्या नोटीशीनंतर अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीनं अनिल देशमुख यांना आज (मंगळवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे

ED Raids Anil Deshmukh: ‘ईडी’ला पूर्ण सहकार्य केलं, पुढील काळातही करु, कारवाईनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

ईडीने अनिल देशमुख प्रकरणात आतापर्यंत केलेल्या चौकशीचा तपशील एबीपी माझाच्या हाती

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment