अमरावतीत तब्बल बाराशे जिलेटीन कांड्या जप्त

Share Now To Friends!!

अमरावती : अमरावती शहर दहशतवाद विरोधी कक्ष  पथकाने आज मोठी कारवाई केली आहे. शहराला लागून असलेल्या नांदगाव पेठ पोलीस हद्दीतील वडगाव माहुरे रोडवर एका वाहनातून तब्बल 1200 नग जिलेटीन कांड्या जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलीसांना नांदगाव पेठ जवळ एक फोर्ड इको स्पोर्ड वाहनामध्ये विनापरवाना ज्वलंतशील स्फोटक पदार्थ गाडीमध्ये बाळगत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यावेळी वाहनातून तब्बल सहा पेट्या जिलेटीनच्या जप्त केल्या ज्यामध्ये 1200 कांड्या जप्त केल्या यावेळी पोलिसांनी एक वाहन आणि दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त अमरावती शहर दाशतवाद विरोधी कक्ष येथील पोलीस अमंलदार हे आज त्यांचे हेडसंबंधाने शहरात पेट्रोलिंग करीत असतांना विश्वसनिय गोपनीय सुत्रान्वये माहीती मिळाली की पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीतील वडगाय माहुरे रोडवर एक फोर्ड इको स्पोर्ट ही चारपाकी वाहन संशयास्पद स्थितीत उभे असून वाहनामध्ये असणारे दोन इसम हे अवैधरित्या आणि विनापरवाना ज्वलनशील स्फोटक पदार्थ गाडीमध्ये बाळगत आहेत. अशा माहितीवरुन दहशतवाद विरोधी कश (ATC) येथील अंमलदारांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 6 पेटया ज्यामध्ये 1200 नग जिलेटीन कांड्या आणि एक फोर्ड इको स्पोर्ट हे चारचाकी वाहन, दोन मोबाईल असा एकूण 10 लाख 59 हजारचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कानसिंह गणपतसिह राणावत (वय 44)  राहणार संगमेश्वर नगर, नांदगाव पेठ ता.जि अमरावनी आणि सुरज भारतसिंह बैस (वय 21) राहणार गजानन नगर, नांदगाव पेठ ता.जि.अमरावती या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपीवर पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा तपास पोलीस स्टेशन नांदगाव पेठ करत आहे..

ही कार्यवाही मध्ये पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचा मोलाचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांचे नेतृत्वात दहशतवाद विरोधी पथकचे सहा. पोलीस निरीक्षक पंकजकुमार नके, आणि दिपक श्रीवास, जमील अहेमद, अमर बघेल, मनोज मोकळे, अभिराज इंदूरकर यांनी केली…

18 फेब्रुवारीला अमरावतीत 25 किलो जिलेटिनसह स्फोटके जप्त

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केले होते त्याचबरोबर जवळपास 200 नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होती. यावेळी तिवसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केलेली तर एक आरोपी मात्र फरार झाला होता.

तिवसा येथील पंचवटी चौकात एक युवक संशयितरीत्या जात असताना त्याच्याजवळ कदाचित दारू असावी असा संशय पोलिसांना आला, पण त्याचा पाठलाग केला असता या आरोपीने त्याच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटरनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला होता. पळालेल्या युवकाचा संदर्भात माहिती घेतल्यानंतर हा युवक सुमीत अनिल सोनवणे राहणार सातरगाव तिवसा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने 25 किलो स्फोटके डिटोनेटर हे  अंकुश लांडगे करजगाव लोणी  याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी अंकुश लांडगेकडे मोर्चा ओढवल्यास बरोबर आणि त्याची चाहूल आरोपीला लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी या ठिकाणावरून 200 नग जिलेटिन आणि 200 नॉक डिटोनेटर हस्तगत केलेली आहेत.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment