इंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा
Share Now To Friends!!
पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणारी वाहने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच इंधनाची बचत हा देखील दुसरा पर्याय आहे. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपल्या कारची किंवा बाईकचे मायलेज वाढवता येऊ शकते.
नियमित देखभाल करा
नियमित देखभाल व सर्विसिंगमुळे वाहनाचे मायलेज वाढण्यास मदत होते.
इंजिन आणि गिअरबॉक्स सारख्या वाहनांच्या सतत फिरणाऱ्या भागांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते. आपण हे न केल्यास ते मायलेजवर परिणाम होतो.
सर्व्हिस ऑईल चेंज, कूलंट ऑइल लेव्हल, चेन लुब्रिकेशन याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
टायरमधील एअर प्रेशर
टायरमधील एअर प्रेशरकडे लक्ष दिले पाहिजे.
टायरवर जास्त दबाव येऊ नये.
मॅन्युफॅक्चररच्या सूचनेनुसार टायरमध्ये हवा भरली पाहिजे.
जास्त भार किंवा वजन असल्यास, गाडीचं हँडबुक वाचा आणि त्यानुसार टायरची हवा चेक करा.
कार पार्क करताना इंजिन बंद करण्यास विसरू नका
जेव्हा कार पार्क कराल तेव्हा इंजिन बंद करा.
जर आपल्याला ट्रॅफिकमध्ये 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायचे असेल तर गाडी बंद केली पाहिजे.
इंजिन सुरू केल्यास अधिक इंधन खर्च होते हा गैरसमज दूर करा.
क्लचचा वापर कमी करा
जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्लच वापरा.
क्लचचा जास्त वापर केल्यास जास्त इंधन वापरले जाते.
जास्त क्लचचा वापर केल्यास क्लच प्लेटदेखील खराब होऊ शकते.
योग्य गियर वापरा
वाहन चालवताना लोअर गियर वापरा आणि हळूहळू तो वाढवा. यामुळे इंजिनवर ताण येत नाही.
वाहनच्या इंजिननुसार गिअर देखील वापरावे.
ट्रॅफिकची माहिती ठेवा
वाहन चालवताना ट्र्रॅफिकची माहिती ठेवा.
आजकाल स्मार्ट फोन आणि रेडिओ स्टेशनवर ट्रॅफिकचे अलर्ट येतात.
या माहितीच्या आधारे आपल्या रुटचा प्लान केल्यास बरेच इंधन वाचू शकते.
जीपीएस वापर
जीपीएसच्या वापरामुळे वाहनचे मायलेज वाढवण्यात मदत होऊ शकते.
कोणत्या मार्गावर जास्त ट्रॅफिक आहे हे शोधण्यासाठी जीपीएसचा वापर होऊ शकतो.
जीपीएसद्वारे कमी अंतराचा रुट शोधला जाऊ शकतात. यामुळे वाहनाचे मायलेजही वाढते.
इंधन कधी भरायचे
सकाळी किंवा रात्री उशिरा गाडीमध्ये इंधन भरले पाहिजे.
गरम झाल्यावर इंधन पसरते आणि थंड झाल्यावर दाट होते.
दुपारी किंवा संध्याकाळी तेल भरण्याऐवजी सकाळी किंवा रात्री उशिरा ते भरले तर फायदा होईल.
Source link
Share Now To Friends!!
Leave a Comment