इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

Share Now To Friends!!

नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनवल्यानंतर आज (मंगळवार 29 जून) कोर्टात हजर केलं होतं. यात 1 इराणी कोरिओग्राफर महिला आणि 4 साऊथ सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रींची समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. 

रेव्ह पार्टीत ड्रग्स वापर करणाऱ्यांसोबत यांच्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टानं केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील ईगतपुरीचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच उठून दिसते. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. खास करून विकेंडला इगतपुरीतील जवळपास सर्वच हॉटेल्स आणि रिसॉर्टची बुकिंग फुल असते. मात्र, याच परिसरातील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिलावर शनिवारी रात्री जे काही सुरु होते ते धक्कादायक होतं. या दोन ठिकाणी रेव्ह पार्टी सुरु होती, ज्यात 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांचा समावेश होता. रविवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह इथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत इथे आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काहीजण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.

Heena Panchal : ग्लॅमरस हिना पांचाळ… नेमकी आहे तरी कोण? नाशिकमधील रेव्ह पार्टीतून अटकेनंतर चर्चेत

पोलिसांनी या सर्व 22 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या, हुक्का, कॅमेरा, ट्रायपॉड आणि इतर साहित्य हस्तगत केलंय. धक्कादायक म्हणजे या पार्टीत कोकेनसह इतर दोन ड्रग्सचाही वापर केला जात होता. या रेव्ह पार्टीत चित्रपटसृष्टीशी संबंधित महिला तर होत्याच मात्र इथे ड्रग्सही आढळून आल्याने खळबळ उडालीय. विशेष म्हणजे ड्रग्स पुरवल्याच्या संशयातून एका नायजेरियन नागरिकाला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ड्रग्सचे मुंबई कनेक्शन या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं
पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment