इरफानच्या पत्नीचा ब्लर फोटो शेअर, ट्रोल झाल्यावर म्हणाला, ‘मी तिचा जोडीदार आहे, मालक नाही’, रिचा चढ्ढा म्हणाली…

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : आपल्याकडे कोण, कधी, कशावरुन ट्रोल होईल हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात सेलिब्रिटी असलेल्या लोकांना तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांवरुन ट्रोल केलं जातं. आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झालाय भारताचा क्रिकेटर इरफान पठाण (Irfan Pathan). इरफान पठाणची पत्नी सफा बेग (Safa Baig)च्या एका फोटोवरुन सध्या त्याच्यावर टीका केली जात आहे. इरफाननं मात्र यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, मी तिचा जोडीदार आहे, तिचा मालक नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

इरफान पठाण (Irfan Pathan Wife) ची बायको सफा बेग हिनं आपल्या मुलाच्या अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. ज्या फोटोमध्ये तिनं तिचा चेहरा ब्लर केला आहे. त्या फोटो इरफान पठाण आणि त्याचा मुलगाही आहे. या फोटोवरुन इरफान पठाण ट्रोल झाला आहे. इरफान पठाण जेव्हाही आपल्या पत्नीसोबत त्याचा फोटो शेअर करतो त्यावेळी त्या फोटोंमध्ये तिचा चेहरा कधीच दिसत नाही, यामुळं त्याच्यावर टीका केली जात आहे.

इरफान (Irfan Pathan Wife Photo) ची पत्नी सफा बेग आपला चेहरा कधीच दाखवत नाही. ती आपला चेहरा नेहमी लपवत असते. अशात लोकांनी इरफानला ट्रोल करणं सुरु केलं आहे. इरफान पठाणच्या खुज्या विचारांमुळं तिला असं करावं लागत असेल असं ट्रोल करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

इरफान पठाणनं काय दिलं उत्तर?

यावर इरफाननं स्पष्टीकरण देताना ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘हा फोटो माझी क्वीन (पत्नी) नं माझ्या मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोमुळं मला खूप वाईट अनुभव आलेत. माझ्यावर टीका होतेय. मला या फोटोला इथंही पोस्ट करायचं आहे. माझी बायकोनं तिच्या मर्जीनं या फोटोत तिचा चेहरा ब्लर केला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी तिचा मालक नाही, तर तिचा जोडीदार आहे’ असं जोरदार उत्तर इरफाननं ट्रोलरांना दिलं आहे. इरफानच्या (Irfan Pathan Tweet)याच ट्वीटला री-ट्वीट करत बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) नं इरफानला पाठिंबा दिला आहे. रिचा चढ्ढानं इरफान च्या ट्वीटला री-ट्वीट करत ‘लव्हली फॅमिली’ असं म्हटलं आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment