कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा बिलं घेणाऱ्या भिवंडीतील रुग्णालयाची नोंदणी रद्द

Share Now To Friends!!

भिवंडी : भिवंडी शहरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिलेल्या डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांच्या  सिराज हॉस्पिटलने रुग्णांकडून उपचाराचे घेतलेले अधिकचे पैसे पालिका प्रशासनाने कळवूनही परत केले नाही. त्यामळे पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी सिराज हॉस्पिटलचा नोंदणी परवाना दोन महिन्यांकरीता रद्द करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कोविड रुग्णांकडून अधिक पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
भिवंडी शहरात कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना भिवंडी शहराकरीता कोविड रूग्णालय स्थापित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली असताना आयुक्तांनी सिराज हॉस्पिटल यास डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले होते. या ठिकाणी दाखल रुग्णांवर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणे व ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता त्यांच्यावर शासन निर्णयाने ठरवून दिलेल्या रक्कमेत उपचार करणे बंधनकारक होते. मात्र असं असताना रुग्णालयाने रुग्णांकडून अधिकचे पैसे उकळल्याचे लेखा समितीच्या तपासणीत निदर्शनात आले होते. 

2020-2021 या आर्थिक वर्षात रक्कम 2 लाख 66 हजार 600 रुपये तर सन 2021 – 2022 या आर्थिक वर्षात 12 लाख 22 हजार रुपये परतावा करण्याचे आदेश दिले असतानाही सिराज हॉस्पिटल प्रशासनाने ती रक्कम रुग्णांना परत केली नाही. त्यासोबत कोविड रुग्णांच्या मृत्यू संदर्भात आयोजित बैठकींना रुग्णालय व्यवस्थापकांनी गैरहजेरी लावल्याने महानगरपालिकेच्या वतीने सिराज मेमोरिअल हॉस्पिटलसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र (Hospital Registration Certificate) मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अधिनियम 1949 चे कलम 7 अन्वये सदरचे आदेश लागू झाल्यापासून दोन महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन  महिन्याचे कालावधीत हॉस्पिटलचे संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात यावे अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेश आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी बजावले आहेत.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment