खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीच्या रॅकेटची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

Share Now To Friends!!

पुणे : खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीचं रॅकेट सुरू झालं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह आल्याचा प्रकार अमरावतीत समोर आला आहे. त्यामुळं कोणत्या लॅबचा रिपोर्ट खरा हा प्रश्न आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार 80 % लोक यांना सिमटम्स नाहीत. ते लोक घरात राहू शकतात असं म्हणणं आहे.  लॉकडाऊन असतांना सुद्धा रुग्ण संख्या वाढलीय. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध आहे,असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करत आहेत. जम्बो कोव्हिड सेंटर आता कॉन्ट्रॅक्टवर दिली आहेत. तिथं अजिबात चांगली परिस्थिती नाही.  प्रायव्हेट डॉक्टरांना तिथं रेफर केलं जात आहे. सरकारने स्वतः जम्बो कोव्हिड सेंटर चालवावं, असं देखील ते म्हणाले.

महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शासन अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगतेय, ही परिस्थिती आहे. गृहमंत्री यांना कुणी सांगितलं, पार्टीने सांगितलं का? कॅबिनेट मध्ये हा विषय झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षातही सत्तेत होते, उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही.  उद्धव ठाकरे यांना कणा नाही . सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे . नवीन सरकार यावं असं माझं मत आहे, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींवरही टीका
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींच आदेशांची पायमल्ली करत आहेत. तिथं एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही.   माझं आवाहन आहे त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी. बंगालच्या लोकांना डिवचले तर चालतं नाही.  मोदी वारंवार तिथं जाऊन त्यांना डिवचत आहेत. ज्या ज्या वेळी तिथं जाऊन प्रचार करतील तेव्हा ममता यांच्या पाच सीट वाढत जातील, असं ते म्हणाले.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment