गर्भवती वाघीण हत्याप्रकरणी 5 जणांना बेड्या, आरोपींच्या वनविभागाचा मोठा फौजफाटा

Share Now To Friends!!

यवतमाळ : जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी (Yavatmal Tigress Murder Case) प्रकरणी आज 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव टेकाम, सोनू टेकाम, गोली टेकाम, बोनू  टेकाम, तुकाराम टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत.

याआधी या प्रकरणी दुभाटी गाव येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मांगुर्ला येथे वाघिणीच्या क्रूरपणे हत्या केल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या वाघिणीची हत्या इतकी निर्घृण होती की हत्या करणाऱ्यांनी गुहे समोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. विशेष म्हणजे ही वाघिण दोन महिन्याची गर्भवती होती. त्याच प्रकरणात पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली. 

मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये 25 एप्रिल रोजी एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघीण मृत अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. वाघिणीच्या गळ्यात फास आढळला व तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते. वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती . 
आज आरोपींना अटक करताना वन विभागाचा मोठा फौजफाटा घेऊन ताफा मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वरपोड या गावी पोहोचला. तिथे कोम्बिंग ऑपरेशन रावबत पथकाने सर्व आरोपींना अटक केली.

विशेष म्हणजे आज जिल्ह्याच्या मारेगाव वनपरीक्षेत्रात असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील एका नाल्याजवळ दिनांक 23 मार्च 2021 रोजी एक पट्टेदार 125 ते 150 किलोची वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती.

या प्रकरणी आज संयुक्त पथकाने झरी तालुक्यातील येसापूर येथे दुसरी धाड टाकत 3 आरोपींना अटक केली. यात आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य आढळून आले. या दोन वेगवेगळ्या वाघ हत्या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment