देशातील 70 वर्षांवरील 10 पैकी एक व्यक्ती अल्झायमरने ग्रस्त, वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य

Share Now To Friends!!

मुंबई : जून हा महिना अल्झायमर आणि मेंदू जनजागृती महिना म्हणून जगभर पाळला जातो. अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूचा आजार म्हणून ओळखला जातो. हा वेडेपणाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाच्या अनेक प्रकारांपैकी अल्झायमर हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

कोहिनूर हॉस्पिटलमधील न्यूरो फिजिशियन डॉ. आकाश छेडा म्हणाले की, "नुकतेच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक वयस्क महिला आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह मध्यरात्री  दाखल झाली. तिला तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होता. त्या महिलेने अल्झायमरचे निदान होण्यापूर्वी बऱ्याच डॉक्टरांना भेट दिली होती. तिला पोटात दुखत असल्याने पोटविकार तज्ञांनाही भेट दिली आणि त्यानंतर ओजीडी स्कोपी करण्यात आली. तपासणीअंती ती सामान्य आली. त्या महिलेने सांधेदुखीची तक्रार केली तसेच पाठदुखी  होत असल्याने ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी तिचे मूल्यांकन केले. तिच्या शरीरातील विविध भागांचे एक्स-रे आणि एमआरआय स्कॅन करण्यात आले जे सामान्य दिसून आले. तेव्हा तिचा स्मृतीभ्रंश आणि एकाधिक तक्रारी अस्पष्ट करण्याच्या संबंधाबद्दल नातेवाईकांना समजले. नातेवाईकांना आजाराचे स्वरूप आणि त्यासह असलेल्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांसंबंधी सल्लामसलत करण्यात आले. त्यांची भीती कमी झाली आणि आजार स्वीकार करण्यास ते सक्षम झाले. यासारखे आणखी बरेच रुग्ण आहेत, ज्यांनी कोविड कालावधी तसेच लॉकडाऊनमध्ये उपचारास विलंब केला."

डॉ. आकाश छेडा म्हणाले की, "70 वर्षावरील  10 पैकी एक व्यक्ती अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त असते. लवकर निदान झाल्यास रुग्ण आणि कुटुंबियांना इतर महत्त्वाच्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यास मदत होते. अल्झायमर रोगामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एखादी परिस्थिती किंवा गोष्ट लक्षात ठेवता येत नाही. त्या व्यक्तीने आहार घेतला की नाही हे देखील लक्षात राहत नाही.  अगदी नावे, वैद्यकीय परिस्थिती, संकेतशब्द आणि एखाद्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या घटनांबद्दल विसर पडणे दिसून येते. अल्झायमरमध्ये मेंदूच्या पेशींचे प्रमाण कमी होऊन मेंदू आकुंचन पावतो. गोंधळणे, मनःस्थितीत बदल होणे, अस्वस्थता, गोष्टी समजून न घेणे, शब्दांचा योग्य उच्चार करण्यास असमर्थता आणि दृष्टीदोष अशी या रोगाची काही लक्षणे आहेत."

डॉ. छेडा पुढे म्हणाले, "अल्झायमर रुग्णांसाठी औषधोपचार आणि तसेच थेरपी घेणे उपयुक्त ठरू शकते. डिमेन्शिया गटातील कोणत्याही व्याधींमध्ये मेंदूच्या कार्यात बाधा येते आणि अल्झायमर हा प्रमुख आजार बनून राहतो. एकदा आजार जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि त्यासाठी वेळ न दवडता तात्काळ उपचार घेणे फायद्याचे ठरेल."

वेळीच निदान झाल्यास उपचारास गती मिळते तसेच आजाराचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. जीवनशैलीतील बदल, जसे की रक्तदाब नियंत्रित करणे, धूम्रपान टाळणे, वजन कमी करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, वाचन करणे, पुरेशी झोप येणे, व्यायाम करणे, तणाव कमी करणे आणि मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणे फायदेशीर ठरु शकते. पीडित व्यक्तीपेक्षाही त्याची काळजी घेणाऱ्या आप्तस्वकीयांसाठी ही अवस्था अत्यंत त्रासदायक आणि कसोटीची असते. स्मृतिभ्रंशग्रस्त रुग्णाला आणि त्याच्या परिवाराला सन्मानाची वागणूक देऊन या असाध्य आजाराशी लढण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे असंही डॉ. छेडा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Corona Update India : गेल्या 76 दिवसांनंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, रुग्णसंख्याही घसरली

Professor Recruitment : पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु, पहिल्या टप्प्यात 3074 प्राध्यापकांची भरती

टीईटी परीक्षेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाकडून 89 याचिका निकाली, 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment