नागपुरात पोलीस स्टेशनसमोरील ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

Share Now To Friends!!

नागपूर : नागपूरमधील कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या चालकाच्या हात आणि पायावर मैं चोर नहीं हूं असं लिहिल्याचं आढळलं आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. चोरीच्या आरोपाखाली 14 जूनच्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.

अशोक नागोत्रा नावाच्या ट्रक चालकाने काल (15 जून) सकाळी कोंढाळी पोलीस स्टेशनसमोरच ट्रकच्या केबिनला तार बांधून गळफास घेतला होता. त्याच्या शवविच्छेदनादरम्यान आत्महत्येपूर्वी त्याच्या डाव्या हातावर “मैं चोर नहीं हू” असं लिहिल्याचे दिसून आलं.

9 जूनच्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव इथल्या पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. त्यावेळी भिवंडीला तेलाचे पिंप घेऊन जाणारे अशोक नागोत्रा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबले होते. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जून ला संध्याकाळी कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा (अफरातफर) गुन्हा दाखल करत ट्रक पोलीस स्टेशनच्या समोर उभा केला होता.

नागपुरात पोलीस स्टेशनसमोरच ट्रकला गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

मात्र, काल सकाळी पोलिसांनी आणून ठेवलेल्या ट्रकला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक नागोत्रा आढळले.

या प्रकरणात पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्यावर अवास्तव दबाव आणला होता का? त्यांना कोणी मारहाण केली होती का? किंवा प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली आहे का? ट्रान्सपोर्ट मालकाने घटनेच्या पाच दिवसानंतर तक्रार का दिली? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत आणि पोलिसांनी त्यांचे उत्तर देणे गरजेचे आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment