पीएफआयच्या खात्यात अवैध मार्गाने पैसे जमा केले जात असल्याचा आरोप

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आता संस्थेच्या बँक खात्यात परदेशातून होणाऱ्या निधीवर बंदी घालण्यात आली आहे. आयकर नियमात संस्थेला देण्यात येत असलेली सूट रद्द करण्यात आली आहे.

पीएफआयच्या खात्यात परदेशातून पैसे येत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे पोहोचली होती. पीएफआयच्या खात्यात अवैध मार्गाने पैसे जमा केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या आरोपांवर कारवाई करत आयकर विभागाने पीएफआयला दिलेली 12AA अंतर्गत मान्यता विभागाने रद्द केली आहे.

आयकर विभागाने पीएफआयला दिलेली सूट बेकायदेशीररित्या वापरली जात आहे. ज्या उद्देशाने ही सूट दिली गेली होती, ती गोष्ट मात्र होत, नसल्याची बातमी एबीपी न्यूजने सर्वप्रथम सप्टेंबर 2020 मध्ये दिली होती.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment