पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू  मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Share Now To Friends!!

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना अटक केली होती. त्यानंतर आता पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना देखील मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.</p>
<p style="text-align: justify;">शशांक पुरुषोत्तम परांजपे आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या परांजपे बंधूंची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वास घात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420 आणि 120 ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर परांजपे बंधुना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment