फ्लिपकार्टवर आजपासून Mobile Bonanza Sale सुरू; या स्मार्टफोन्सवर मोठी सूट

Share Now To Friends!!

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून Mobile Bonanza Sale सुरू झाला आहे. 11 एप्रिलपर्यंत चालणार्‍या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. याशिवाय या हँडसेटवर बर्‍याच चांगल्या ऑफरही उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Apple, Asus, Realme यासारख्या बड्या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सेलमध्ये फोनवर काय ऑफर आहेत, जाणून घेऊया.

काय आहेत ऑफर्स?

फ्लिपकार्ट Mobile Bonanza Sale मध्ये स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह खरेदी करता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरचा फायदाही यूजर्सना देण्यात येत आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर तुम्हाला दोन हजार रुपयांपर्यंतचे कॅशबॅकही मिळेल.

Oppo F19 भारतात लॉन्च; फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक खास फिचर्स

या फोनवर सूट मिळणार

फ्लिपकार्टच्या Mobile Bonanza Sale मध्ये iPhone SE वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. येथे आपल्याला या फोनसाठी केवळ 29,999 रुपये द्यावे लागतील. तसेच लोकप्रिय गेमिंग फोन Asus Rog Phone 3 वर या सेलमध्ये 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. सूट मिळाल्यानंतर 46,999 रुपये असलेल्या या फोनची किंमत 41,999 रुपये झाली आहे. याखेरीज लेटेस्ट Realme Narzo 30 Pro वर एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, जर तुम्हाला मोटो जी 10 पॉवर घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त 9,499 रुपयात ऑर्डर करू शकता.

इतर बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment