बहुप्रतिक्षित Samsung Galaxy A32 4G भारतात लॉन्च; फिचर्स अन् किंमत काय?

Share Now To Friends!!

मुंबई : लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Samsung ने आज भारतात आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Galaxy A32 लॉन्च केला आहे. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएटंची किंमत 21999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही हा फोन Paytm वरुन खरेदी केला, तर तुम्हाला 1000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. त्याचसोबत 1035 रुपयांच्या EMI वरही तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. हा फोन पाच मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही सॅमसंगच्या ऑफिशिअल वेबसाइटवर जाऊन ऑर्डर करु शकता.

4G मॉडल लॉन्च

सॅमसंगने Galaxy A32 स्मार्टफोनचं 4G मॉडल भारतीय बाजाराता उतरवण्यात आलं आहे. लवकरच या स्मार्टफोनचं 5G वर्जनही लवकरच कंपनीकडून लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर 4G मॉडलबाबत बोलायचं झालं तर हा फोन Awesome Violet, Awesome Black, Awesome Blue आणि White या कलर्समध्ये उपलब्ध होणार आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Samsung Galaxy A32 4G मध्ये 6.4 इंचाची इनफिनिटिव्ह U FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. यामध्ये तुम्हाला 800nits चा पीक ब्राइटनेसही देण्यात आलेला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरही देण्यात आलेला आहे. याशिवाय फोनमध्ये 6B रॅम 128 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने एक टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

कॅमेरा

Samsung Galaxy A32 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेलं आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमरा 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

5000mAh बॅटरी

Samsung Galaxy A32 मध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट करते. यामध्ये डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी Eye Comfort Shield चा सपोर्ट देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment