बिटकॉईनने पाच महिन्यातील निचांकी पातळी गाठली, किंमत 22 लाखांवर घसरली

Share Now To Friends!!

Bitcoin Crash : एकेकाळी विक्रमी 50 लाखांवर गेलेली एका बिटकॉईनची किंमत आता 22 लाखांवर आली आहे. बिटकॉईनची ही किंमत गेल्या पाच महिन्यातील निचांकी पातळीवर असून अजून यात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या माहितीनुसार, एक बिटकाईनची किंमत ही 29,511 डॉलरवर पोहोचली असून 22 जानेवारीनंतर पहिल्यांदाच 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे जवळपास 22 लाखांवर आली आहे. चीनने आपल्या देशातील क्रिप्टोकरंसीबाबतच्या नियमांत बदल केल्याने बिटकॉईनची किंमत घसरली आहे. 

चीनच्या धोरणात बदल
चीनने आपल्या क्रिप्टोकरंसीच्या नियमांत बदल करुन क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. त्याचा परिणाम ही बिटकॉईनच्या किंमतीवर झाल्याचं दिसून आलं आहे. चीन ही क्रिप्टोकरंसीचे ट्रेडिंग आणि मायनिंगसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सांगितलं जातं. चीनने क्रिप्टोकरंसीच्या धोरणात बदल केल्याने त्याचा फटका बिटकॉईनला बसला आहे. आता याचा परिणाम जगभरातील क्रिप्टोकरंसीच्या व्यवहारांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन नेहमी काही ना काही वेगळी धोरणं राबवून जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरतो अशी तक्रार अनेक देश करतात. आता क्रिप्टोकरंसीचे बदललेले धोरण हा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.  

इलॉन मस्कचीही माघार
सुरुवातीला बिटकॉईनचे समर्थन करणाऱ्या टेस्लाच्या इलॉन मस्क यांनीही गेल्या महिन्यात आपण बिटकॉईन वापरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉईनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉईनचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ इलॉन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलंय. इलॉन मस्क यांच्या बिटकॉईन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या होत्या.

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment