‘माझा’च्या बातमीनंतर 10 मिनिटांत मदत, सुप्रिया सुळेंनी दोन चिमुकल्यांचं पालकत्व स्वीकारलं!

Share Now To Friends!!

मुंबई/पुणे : कोरोनामुळे घाला घातलेल्या जेजुरीमधल्या घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचं पालकत्व आणि जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे. एबीपी माझावर आज सकाळी सातच्या बातमीपत्रात घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी या बातमीची दखल घेत आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या चिमुकल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्यांसाठी एबीपी माझाने विशेष मोहीम सुरु केली आहे, ज्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे.

जेजुरीमधल्या घोणे कुटुंबातील या दोन मुलींच्या आई-वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. मोठ्या मुलीचं वय साडेचार वर्ष तर धाकट्या मुलीचं वय दीड वर्ष आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर दोघींचीही जबाबदारी वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली.  ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या दोघींचं पालकत्व स्वीकारणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

त्या म्हणाल्या की, “मी आणि शरद पवार सकाळी दररोज वृत्तपत्र वाचतो. यावेळी तुमचं चॅनल लावल्यावर ही धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी आम्ही पाहिली. त्यामुळे तातडीने निर्णय घेत या दोन्ही मुलींना मदत करणं हे कर्तव्य आहे. या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमचं कुटुंब घेत आहे. जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणालातरी तिथे पाठवत आहेत. पाठपुरावा करुन त्यांच्या आजी-आजोबांना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत.”

“मी याबाबत सरकार, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक लोकप्रतिधीने आपापल्या मतदारसंघात जमेल तशी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने आपली वेळ जरी दिली तरी त्यांना आधार मिळेल,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जेजुरीच्या घोणे कुटुंबाची व्यथा!
कोरोनामुळेच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींचा संसार उद्ध्वस्त झाला. तर महाराष्ट्रातील अनेक मुलं अनाथ झाली आहेत. जेजुरीतील सूरज घोणे आणि त्यांच्या पत्नी दुर्गा घोणे यांचं कोरोनामुळे निधन झालं. दुर्गा यांचं 17 मे रोजी कोरोनाने निधन झालं तर सूरज यांचं निधन 20 जून रोजी झालं. या दाम्पत्याला दोन लेकी आहेत. सूरज आणि दुर्गा यांच्या जाण्याने त्यांच्या अनघा आणि आनंदी या दोन गोंडस मुली अनाथ झाल्या आहेत. अनघा ही साडे चार वर्षांची आहे तर आनंदी ही अवघ्या दीड वर्षांची. या दोन मुलींच्या भविष्याची चिंता तिच्या आजी आजोबांना आहे. 

सूरज घोणे हा आई-वडील आणि काका काकूंचा आधार होता. घरातील कर्ता पुरुष आणि सून गेल्याने घोणे कुटुंबातील लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूरज आणि दुर्गा याचं 2016 मध्ये लग्न झालं, संसार सुखाचा सुरु होता. सूरज एका खाजगी फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. पण अचानक कोरोनाने घाला घातला आणि होत्याच नव्हतं झालं. दुर्गा यांचं 17 मे रोजी तर सूरज यांचं 20 जूनला कोरोनामुळे निधन झालं. यामुळे अनघा आणि आनंदी या दोन गोंडस मुली अनाथ झाल्या. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment