‘माझ्याकडे का पाहतो’ म्हणत गुंडांनी भोसकले, पोटात चाकू घेऊन तरुण पोलिस ठाण्यात, नागपुरात गुंडगिरीचा कळस 

Share Now To Friends!!

नागपूर : नागपुरातील गुंडगिरीचा (Nagpur Crime Update) कळस दाखवणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून गुंडांनी दोन युवकांना भोसकले धक्कादायक म्हणजे पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला दाखल झाले. नागपूरच्या कपिल नगर पोलिस (Nagpur Kapil Nagar Police station) स्टेशन अंतर्गत माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून म्हाडा कॉलनी परिसरातील काही गुंडांनी विनय राबा आणि कुणाल जयस्वाल या दोन्ही तरुणांवर जीवघेणा हल्ला केला.

बाबा ताजुद्दीन दर्गा जवळ रात्री झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी विनय आणि कुणालला आमच्याकडे रागाने का पाहता एवढ्या कारणावरून त्यांच्या पोटात आणि पाठीवर धारदार चाकू भोसकले. या हल्ल्यात विनय आणि कुणाल गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोघेही त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.  

विनय आणि कुणाल हे दोघेही कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी आहे. यात कुणाल वाघमारे सोबत त्याच परिसरात राहणाऱ्या सलमान शेख याने माझ्याकडे का पाहतो या कारणाने वाद केला. यानंतर हा वाद मिटला. पण रविवारी रात्री साडे 10 वाजताच्या सुमारास कुणाल वाघमारे याला बोलवले. यावेळी त्याचसोबत विनय राबा आणि त्याचा भाऊ सुद्धा सोबत होता. यावेळी सलमान शेख, शमशेर शेख यांच्यासोबत असलेल्या 7 जणांनी कुणाला वाघमारेला पाठीत तर विनय राबला पोटात चाकू मारला. यात कल्पेश राबा हा सुद्धा किरकोळ जखमी झाला होता. 

विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर दोघेही त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत कपिलनगर पोलीस स्टेशनला पोहोचले. यावेळी विनय राबाच्या पोटात तर कुणाला वाघमारेच्या पाठीत चाकू खुपसलेला होता. यावेळी कपिल नगर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पोलीस वाहनात मेयो रुग्णालयात नेले. नेमका हाच पोटात चालू असलेला व्हिडिओ शहरात झपाट्याने व्हायरल झाला असून चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

पोलिसांनी या घटनेसंदर्भात म्हाडा कॉलनी परिसरातला गुंड सलमान शेख याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक केली आहे. गंभीर जखमी झालेल्या विनय आणि कुणाला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment