मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा

Share Now To Friends!!

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या रस्त्यावरील गर्दी अशी राहिली तर कोरोनाचा सामना करण्यासाठीचे निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुंबईतील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या चाचणीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं.&nbsp;</p>
<p>मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहिलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment