मुंबई विमानतळावर 21 कोटींच्या हिरॉईनसह झाम्बियाची महिला अटकेत

Share Now To Friends!!

मुंबई : मुंबई विमानतळावर गुरुवारी (17 जून) डीआरआयने झाम्बियाच्या एका महिलेकडून 21 कोटी रुपये किंमतीचं तीन किलो हिरॉईन जप्त करुन तिला अटक केली. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटमध्ये महिलेचा समावेश
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ज्युलियाना मुताले असं या आरोपी महिलेचं नाव असून ती दोहामार्गे जोहान्सबर्गहून मुंबईला आली होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारवर महिलेच्या बॅगची तपासणी केली, ज्यात हिरॉईनची पाकिटं ठेवली होती. स्थानिक कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही परदेशी महिला एका आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग आहे. हे सिंडेकट जी शरीर आणि सामानामध्ये लपवून अंमल पदार्थांची तस्करी करतं, असं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. यंत्रणेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआय मुंबई झोन युनिटच्या अधिकाऱ्यांनी आरोपी महिलेला अटक केली.

पोलिसांकडून रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध सुरु
महिलेने चौकशीदरम्यान माहिती दिली की, जोहान्सबर्गमध्ये सोपवण्यात आलेलं ड्रग्जचं पाकिट तिला मुंबईत पोहोचवायचं होतं. ज्याला हे पाकिट द्यायचं होतं, त्या व्यक्तीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं तिने सांगितलं. डीआरआयच्या अधिकारी आता तिचे फोन कॉल डिटेल्स स्कॅन करुन शहरातील ड्रग्स रॅकेटच्या इतर सदस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अंमली पदार्थांची तस्करी करण्याची बाब महिलेने कबूल केल्याचं तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असून गरिबी दूर करण्यसाठी पैशांच्या लालसेपोटी ड्रगची तस्करी करत असल्याचं महिलेने यंत्रणेला सांगितलं. या महिलेकडे बिझनेस व्हिसा असून ती पहिल्यांदा भारतात आली होती. सध्या तिला भायखळ्यातील महिला जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment