राज्यात मोदींच्या नव्या शिलेदारांच्या नेतृत्वात भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

Share Now To Friends!!

मुंबई : आजपासून भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. आज मराठवाड्यात भागवत कराड, ठाणे- कल्याणमधून कपील पाटील तर पालघरमधून भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहे.  नारायण राणे 20 ऑगस्टपासून यात्रा सुरू करतील.

मात्र पहिल्याच दिवशी  या जनआशिर्वाद यात्रेला राजकिय दृष्टीनं पाहिलं जातंय, प्रशासनातील अधिका-यांकडून जाणिवपूर्वक या यात्रेतील मंत्र्यांना, नेत्यांना भेटणं, त्यांना माहिती देणं टाळलं जातंय असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केला आहे. 

केंद्रीय मंत्रीमंडळात नव्यानं स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला आजपासून सुरु झाली आहे. भारती पवार, कपील पाटील, भागवत कराड, आणि नारायण राणे हे चार मंत्री आता या यात्रेच्या निमीत्तानं महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. केंद्र सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि महाविकास आघाडीचं अपयश दाखवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. आगामी महापालिका आणि इतर पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या यात्रा महत्वाच्या मानल्या जात आहेत.
पण यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले गेलेत…

केंद्रीय राज्य आरोग्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच भारती पवार पालघरमध्ये आल्या. आदिवासी समाजाचा चेहरा केंद्रीय मंत्रीमंडळात गेल्यानंतर पालघरमधली आदिवासी वोट बॅंक मजबूत करण्याच्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र, ग्रामिण भागातही केंद्रानं सगळी मदत पाठवूनही प्रत्यक्षात प्रशासनाकडून मोठ्या कमतरता राहिल्या आहेत असं भारती पवारांनी म्हणटलं आहे. 

भारती पवारांनी यात्रेच्या सुरुवातीपासूनच प्रशासनाला लक्ष्य केलंय. ‘केंद्रीय मंत्री तुमच्या भागात येतात मात्र जिल्हाधिकारी फोन स्विच ऑफ ठेवतात. या मागे राजकिय हेतू नाही कशावरुन’ असा सवालही त्यांनी केला आहे.

 प्रोटोकॉल नेमकं काय सांगतो?

मंत्र्यांचा दौरा जर शासकीय असेल आणि त्या दौ-याबाबतचे वेळापत्रक अधिकृतरित्या मंत्र्यांकडून प्राप्त झाल्यानंतर या दौ-याला उपस्थित राहणं जिल्हाधिका-यांना बंधनकारक आहे.  सध्याची जनआशीर्वाद यात्रा हा शासकीय दौरा नसून हा दौरा राजकिय आहे. केवळ शिष्ठाचार म्हणून मंत्र्यांना माहिती देण्याकरता बिगरशासकीय दौ-यांना अधिकारी उपस्थित राहु शकतात. भारती पवारांनी प्रशासकिय अधिकारी त्यांच्या दिमतीला गेले नाहीत म्हणून आगपाखड करु नये असं महाविकास आघाडीतील पक्षांनी म्हटले आहे.

राज्यात इथुन पुढे काही दिवस भाजपची ही जनआशीर्वाद यात्रा सुरु असणार आहे. यानिमीत्तानं पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीत कुरघोड्यांचं राजकारण बघायला मिळेल. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment