वंशाचा दिवा मुलगाच हवा मुलगी नको म्हणून केला आईचा छळ

Share Now To Friends!!

परभणी : वंशाचा दिवा लावण्यासाठी मुलगाच हवा परंतु मुलगी झाली म्हणून आईचा छळ करण्यात आला. आईचा छळ करून तिला घराबाहेर हाकलून देऊन मुलीचा ताबा घेणाऱ्या सासरच्या विरुद्ध आईने न्यायालयात दाद मागितल्यानंतर महिन्याभराने एक वर्षाच्या आराध्याला पोलिसांनी सुखरूप आईच्या स्वाधीन केले.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कवठा येथील सतीश दुभळकर यांच्यासोबत औंढा नागनाथ तालुक्यातील मुर्तिजापूर सावंगी येथील रुक्मिणी कोकाटे यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही दुभळकर यांच्या ठाणे येथील  घरी राहण्यासाठी गेले होते. वंशाचा दिवा मुलगाच हवा म्हणून सासरच्या मंडळीकडून रुक्मिणीला नेहमीच तगादा लावला जात होता. गरोदर असताना आत्ताच मुल नको झाले  तर मुलगाच व्हावा म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. यानंतर तिला मुलगी झाली. सासू-सासरे व नवर्‍याला मुलगी नको होती म्हणून तिचा छळ केला जात होता.

 मुलगी झाल्यानंतर हौसेपोटी  रुक्मिणी यांनी ठाणे येथे मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत ठेवला होता. यावेळी रुक्मिणीचा भाऊ वहिनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली याच दिवशी सासरच्या मंडळींना त्रास देऊन रुक्मिणीला मारहाण करून तिला फाशी देण्याचा प्रयत्न केला.  मुलगी हिसकावून घेतली व तिला घराबाहेर हाकलून दिले.  त्या जात नसल्याने तिला मारहाण केली यातून कसाबसा जीव वाचवीत रुक्मिणी व त्यांच्या भावाने गाव गाठले. यावेळी सासरच्यांनी एक वर्षाच्या मुलीला स्वतःच्या ताब्यात ठेवले होते.

  रुक्मिणी यांनी औंढा येथील न्यायालयात मुलीचा ताबा मिळावा म्हणून दाद मागितली होती. न्यायालयाने मुलगी अज्ञान असल्याने व तिचा सांभाळ सासरच्यापेक्षा आई  चांगल्या रीतीने करू शकते असा निकाल दिल्याने पोलीस निरीक्षक वैजनाथ  मुंडे यांनी जमादार धोंडीबा दिघडे,जमादार रवी इंगोले,संदीप टाक यांचे पथक नेमून ठाणे येथील रुक्मिणीच्या घरी पाठवले.  या ठिकाणी सासरच्या मंडळीने मुलगी देण्यास नकार दिला होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेऊन पोलिसांनी औंढा पोलीस ठाण्यात एक वर्षाच्या मुलीला आणून तिची आई रुक्मिणी तिच्या स्वाधीन केले. मुलीला आणल्यानंतर औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये एक वर्षाची आराध्या औंढा पोलिसांनी आईच्या  स्वाधीन केली.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment