वाढदिवसाच्या पार्टीनिमित्ताने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

Share Now To Friends!!

पुणे : पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी या मुलीला वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित मुलीने विरोध केला असता तिच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यामुळेच हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. या घटनेने  एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी पाच जणांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.

जनता वसाहत परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. 15 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने आपल्याला एका मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून तिला वारजे परिसरात नेले. त्या ठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर एका खोलीत नेऊन पीडित मुलीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेली मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपींनी तिला आणखी दोघे येणार आहेत त्यामुळे घरी जाऊ नकोस असे सांगत तिला अडवून ठेवले. तरीही पीडित मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता एका आरोपीने तिच्या दिशेने गोळी झाडली. पीडित मुलीने यावेळी छातीजवळ मोबाईल ठरलेला असल्यामुळे ही बंदुकीची गोळी या मोबाईलवर लागली. त्यामुळे सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. आरोपींनी त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीला तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले.

अशी उघडकीस आली घटना…

गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही व्यक्तीजवळ पिस्तुल असून त्यांनी गोळीबार केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पिस्तुल कुठून आणले याबाबत चौकशी करीत असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल केला आहे.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment