व्हॉट्सअ‍ॅपवरील अनावश्यक मॅसेजेच क्लीन कसे करावे? जाणून घ्या सोपी ट्रिक

Share Now To Friends!!

बर्‍याचदा आपण पाहतो की आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं किंवा स्लो प्रोसेस होते. अशा परिस्थितीत काय करावे हे आपल्याला कळत नाही. आपण व्हॉट्सअॅप चॅटमधील अनावश्यक फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट यासारख्या गोष्टी डिलीट करत नाही. त्यामुळे आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप कसे क्लीन करावे ते सांगणार आहोत.

WhatsApp मध्ये हे फिचर डिसेबल करा
व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टोरेजसोबत फोनचे स्टोरेजही वाढत असते. या स्टोरेजच्या वाढीमुळे फोन हळूहळू स्लो काम करण्यास सुरुवात करतो. यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो सेव्ह मीडिया फाइल्सचा पर्याय डिसेबल करू शकता. ज्यानंतर आपल्याला पाहिजे असलेली केवळ मीडिया फाइल आपल्या फोनमध्ये जतन होईल आणि फोनमधील स्पेस वाढेल.

WhatsApp ला असे करा क्लीन

  • सर्वप्रथम WhatsApp ओपन करा आणि सेटिंग्ज वर जा.
  • त्यानंतर डेटा आणि स्टोरेज वापरावर टॅप करा.
  • येथे Storege Use चा पर्याय खाली दिसेल.
  • आपण स्टोरेज युज वर टॅप करताच सर्व चॅटची सूची दिसेल.
  • येथे आपण कोणत्या चॅटमध्ये किती स्टोरेज वापरले जात आहे ते तपासू शकता.
  • हे केल्यावर, जे आयटम्स आपण हटवू इच्छिता त्या चॅटवर टॅप करा.
  • यानंतर सर्व फोटोंची यादी आपल्या समोर येईल.
  • आता या यादीमध्ये आपल्या उपयोगात नसलेले गोष्टी हटवा.
  • यासह आपले व्हॉट्सअ‍ॅप क्लीन होईल आणि स्पेसही वाढेल.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment