संतापजनक…! पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीकडून सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Share Now To Friends!!

<p style="text-align: justify;"><strong>नालासोपारा : &nbsp;</strong> पाळणाघरातील एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडं झाली आहे. आईच्या तक्रारीवरुन पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. &nbsp;</p>
<p style="text-align: justify;">नालासोपारा पश्चिमेकडील एका पाळणा घरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच उघडं झालं आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारी महिला आपल्या सात वर्षाच्या चिमुरडीला तेथील जवळच्या पाळणाघरात सोडून कामावर जात होती. &nbsp;पाळणाघर चालवणाऱ्या महिलेचा पती त्या चिमुरडीवर मागील दीड महिन्यापासून अत्याचार करत होता. ही बाब जेव्हा चिमुरडीच्या आईला कळली त्यावेळी तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, आरोपीला तात्काळ अटक ही केली.</p>
<p style="text-align: justify;">वसई न्यायालयाने आरोपीला सोमवार 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पाळणाघरात किती मुली बेबी सिटींगसाठी आल्या होत्या? आता किती आहेत? त्याबाबत त्यांच्या काही तक्रारी आहेत का याबाबत आता पोलीस तपास करणार आहेत.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment