सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून एन्ट्री फी घेण्याचा निर्णय लागू होण्यापूर्वीच स्थगित

Share Now To Friends!!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता निर्धारित शुल्क भरावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून प्रति महिना  शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. ज्यांना विद्यापीठात जॉगींग किंवा व्यायामासाठी यायचे असेल त्यांना १ हजार रुपये मासिक शुल्क विद्यापीठ प्रशासनाकडे जमा करावे लागणार होते.

सदर निर्णयाबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एसपीपीयू ऑक्सी पार्क ही योजना जाहीर केली. त्याअंतर्गत आता विद्यापीठात सकाळ, संध्याकाळी प्रवेश करण्यासाठी शुल्क भरावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. २१ जूनपासून ही  योजना लागू होणार होता. पण आता या निर्णयाची अंमवबजावणी होण्याआधीच तो स्थगित करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत दिली आहे.

Video : एकनाथ शिंदे यांचा शेतात पेरणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल

’सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल’, असं ते ट्विट करत म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल.

— Uday Samant (@samant_uday) June 12, 2021

https://platform.twitter.com/widgets.js

निर्णयाअंतर्गत आकारलं जाणार होतं इतकं शुल्क

नागरिकांना मासिक शुल्क १ हजार रुपये, सहामाही शुल्क ५ हजार ५०० आणि वार्षिक शुल्क दहा हजार रुपये असे विद्यापीठाच्या आवारात फिरण्यासाठी दर ठरवण्यात आले होते. हे शुल्क भरणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून ओळखपत्र दाखवणाऱ्यांनाच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार होता. मात्र या निर्णयाला झालेला विरोध पाहता तो स्थगित ठरवण्यात आला.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment