स्मार्टफोन चार्जिंग करताना ‘ही’ काळजी घ्या; बॅटरी लाईफ वाढण्यास होईल मदत

Share Now To Friends!!

Tech Tips : जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर स्मार्टफोनला चार्ज कसे करावे हे माहित असणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने फोनला चार्जिंग केल्यास फोनच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल चार्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तर योग्य प्रकारे चार्जिंग करण्याच्या काही सोप्या टीप्स जाणून घेऊयात.

रात्रभर स्मार्टफोन चार्ज करू नका

बरेच लोक झोपताना आपला स्मार्टफोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी बाहेर काढतात. जास्त चार्जिंग केल्याने आपले डिव्हाइस जास्त गरम होते आणि बर्‍याच वेळा असे केल्याने बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्ज करु नका.

खराब क्वालिटीचा चार्जर वापरू नका

बरेच लोक कोणत्याही स्मार्टफोनच्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करतात. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. खराब क्वालिटीचा चार्जर बॅटरीच्या बॅकअपवर वाईट रीतीने परिणाम करू शकतो. म्हणून नेहमी ओरिजनल चार्जर वापरा.

चार्ज करताना त्याचा वापर करु नका

अनेकांन फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलणे किंवा फोनचा वापर करण्याची सवय असते. मात्र चार्जिंग करताना स्मार्टफोन वापरणे टाळावे. याचा तुमच्या फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. तज्ञांच्या मते, चार्जिंग करताना गेम तर अजिबातच खेळू नये, यामुळे फोनही ओव्हरहिट होण्याची शक्यता असते.

बॅटरी पूर्णपणे डाऊन होऊ देऊ नका

बरेच लोक एकाच वेळी त्यांचा स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करतात आणि नंतर दिवसभर वापरतात. फोन पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत ते याचा वापर करतात. असे केल्याने बॅटरीची लाईफ कमी होते. तर पूर्ण चार्ज करण्याऐवजी, आपण दिवसातून काही वेळा आपला फोन चार्ज करु शकता.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment