हिमाचलमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळली

Share Now To Friends!!

शिमला : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळल्याने  9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे.  हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नावरून वऱ्हाडाला घेऊन जाणारी एक गाडी शिल्लई उपमंडलमधील पाशेंगाजवळील एका दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण पौंटा साहिब आणि शिल्लई उपमंडळाच्या सीमेवर आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

मृत्यू झालेल्यांपैकी आठ जण हे एकाच गावातील आहे.  आठ जण हे चढेऊ गावातील आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनच्या मदतीने मदत कार्य जोरात सुरू आहे. हे सर्वजण लग्नाला जात असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अद्याप अपघात कसा झाला  या बाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही यासंदर्भात देखील तपास सुरू आहे. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment