Ajit Pawar:फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले, फ्लेक्स लावायला मी सांगितलं का

Share Now To Friends!!

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात  फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की,  फ्लेक्स लावायला मी सांगितलं का? अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं का? गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष आहे. चुकीचे होर्डिंग असतील तर पोलिसांनी काढावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

अजित पवारांनी केलं होतं आवाहन
राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज पुण्यात बोलताना शाळा सुरू करण्यासंदर्भात ते म्हणाले की, शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रत्येक विभागाचे मत आहे. अजून 100 दिवस महत्वाचे आहेत. ग्रामीण भागात अजूनही लोक जबाबदारीने वागत नाहीत. यंत्रणांनी सध्याची शिथिलता अधिक कठोर केली पाहिजे, असं ते म्हणाले.  

पॅगसीस प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, कायद्याचा दुरुपयोग करणं वाईट आहे. संसदेत चर्चा सुरू आहे.  पण ज्या बातम्या आल्या त्यानुसार कुठं तरी पाणी मुरतंय.  पार्लमेंटमध्ये सरकारने सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं ते म्हणाले. 

लसीकरणाबाबत ते म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी. लस उपलब्ध होत नसल्याने वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं पण अजूनही पुरेशी लस नाही मिळाली.  पण लोकांची लस घेण्याची  मानसिकता झालीय ही सकारात्मक बाब आहे, असं ते म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, संजय राऊत  पक्षातील कार्यकर्त्यांना जोश देण्यासाठी महापौर करणार असा दावा करतात. प्रत्येक पक्ष असा दावा करतो. त्यात काही नवीन नाही, असंही पवार म्हणाले.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment