Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब नोंदवणार : सूत्र

Share Now To Friends!!

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीनं त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. परंतु, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याची माहिती सुत्रां कडून मिळत आहे. देशमुखांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर सध्या वकीलांची खलबतं सुरु आहेत. गृहमंत्री असताना देशमुख ज्ञानेश्वरी या बंगल्यावर राहत होतो. मात्र सध्या ते तिथेच असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक वकील ज्ञानेश्वरी या बंगल्यावर दाखल होत आहेत. 

शुक्रवारी ईडीचं धाड सत्र संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. परंतु, शनिवारी दिलेल्या नोटीशीनंतर अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीनं अनिल देशमुख यांना आज (मंगळवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. परंतु, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती, सुत्रांकडून मिळत आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर वकिलांची खलबतं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, “काही कागदपत्रे घेऊन यायची आहेत. हे ईडीने सांगितले नाही. आता मी ईडी कार्यालयात जाऊन काय कागदपत्रं मागितली आहेत, हे पाहणार आहे.  अजून कोर्टात जामीनासाठी गेलो नाही. कागदपत्रे मिळाल्यानंतर अनिल देशमुख आज ईडी समोर जाण्याची शक्यता आहे. मात्र अनिल देशमुखांकडून ईडीला जे पत्र देण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते प्रत्यक्षात चौकशीला हजर राहू शकत नाही. तर व्हिडीओच्या माध्यमातून ते चौकशीला हजर राहतील. मात्र त्याआधी ईडीने संबंधित प्रश्नांची यादी आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवावी.”

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेण्यात आले. 

ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment