Apple WWDC 2021: Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, युजर्ससाठी पर्वणी

Share Now To Friends!!

Apple ने काल (सोमवारी) आपल्या जागतिक परिषदेत (WWDC) चं आयोजन केलं होतं. परिषदेची सुरुवात अॅप डेव्हलपर्सच्या एका फिल्मनं झाली. WWDC या इव्हेंटमध्ये नव्या सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा करते. जाणून घ्या परिषदेमध्ये अॅपलनं केलेल्या मोठ्या घोषणांबाबत…

Apple Health : कुटुंबांसोबत डाटा शेअरिंग 

अॅपल युजर्स आपल्या कुटुंबांच्या सदस्यांसोबत हेल्थ अलर्ट आणि डाटा शेअर करु शकणार आहेत. अॅपलनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरु शकतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रांजिटमध्ये सरव् डाटा एन्क्रिप्ट करण्यात येईल. 

Apple Health : न्यू फिचर्स

Apple एक नवी सुविधा युजर्ससाठी घेऊन आलं आहे, ती म्हणजे Apple Health. हे फिचर तुमच्या चालण्याच्या पद्धतीवरुन पडण्याच्या शक्यतांची माहिती तुम्हाला देणार आहे. तुमची स्थिरता आणि चालण्यातील जोखिम निश्चित करण्यासाठी अनेक मीट्रिकचा उपयोग करण्यात येतो. युजर्सना या फिचर मार्फत एक सूचना मिळेल, जर तुमची स्थिरता कमी असेल तर अॅपमध्ये त्यासाठी तुम्हाला एक एक्सरसाइजही देण्यात येईल. 

Apple WWDC 2021 : प्रायव्हसी

Apple नवनवीन प्रायव्हसी फिचर्स युजर्ससाठी घेऊन आलं आहे. अॅपल आयपी अॅड्रेस लपवण्यासाठी मेल प्रायवसी प्रोटेक्शन जोडत आहे. यामुळे सेंडरला तुम्ही मेल ओपन केलाय की, नाही यासंदर्भातील माहिती कळू शकणार नाही.  Apple सफारीमध्ये ट्रॅकर्सपासून आयपी अॅड्रेसही लपलेला आहे. अॅपल सेटिंग्समध्ये एक नवा प्रायव्हसी रिपोर्ट दिला जात आहे. यामुळे युजर्स अॅप कशाप्रकारे प्रायव्हसी सेटिंग्सचा वापर करत आहे, हे पाहू शकणार आहे. अनेक अॅप्स तुमच्या लोकेशन, फोटो इत्यादी फइचर्सचा वापर करत असतात. 

Apple iOS 15 : कॅमेऱ्यासाठी Google लेंससारखं फिचर : लाईव्ह टेक्स्ट

असं वाटतं की, iOS ला शेवटी Google लेंससारखी सुविधा दिली जात आहे. जिथे हे एका फोटोमध्ये टेक्स्टची ओळख करु शकतो आणि युजर्सना कॉपी करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. लाईव्ह टेक्स्ट युजर्सना टेक्स्ट, फोन नंबर, लिंक इत्यादीची ओळख करु देईल. हा स्क्रिनशॉर्ट, क्विक लूकवर काम करेल आणि सात भाषा जाणून घेईल. हा आयफोन, आयपॅड आणि मॅकवरही काम करेल.

Apple iOS 15: Notifications

नोटिफिकेशनसाठीही अॅपलनं नवी फिचर्स लॉन्च केली आहेत. आता युजर्सना एक डेडिकेटिड मोड सेट करता येणार आहे. जेणेकरुन नको असलेले मेसेज युजर्सना त्रास देणार नाहीत. तसेच अत्यंत आवश्यक मेसेजच युजर्सपर्यंत पोहोचतील. एक नवा फोकस मोडही देण्यात येणार आहे. ज्यामार्फत युजर्स फोकस मोड सेट करु शकतात. जिथे दिवसाच्या एका निर्धारित वेळेदरम्यान केवळ काही अॅप्सचे नोटिफिकेशन्स आणि अलर्ट्स दिसतील. 

Apple iOS 15: मेसेज

Messages ना एक नवं अपडेट मिळणार आहे. एक नवं Shared with You सेक्शन असेल. युजर्स त्या मेसेजला पिनही करु शकणार आहेत. जे त्यांच्यासाठी आवश्यक असेल. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment