Asian Boxing Championships: अंतिम सामन्यात मेरी कोमचा पराभव, कझाकस्तानच्या नाझीम किझीबेने मारली बाजी

Share Now To Friends!!

आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपच्या (Asian Boxing Championships) अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या नाझीम किझीबेने सहा वेळा विश्वविजेती असलेल्या मेरी कोमचा पराभव केला. 51 किलो गटातील अंतिम सामन्यात मेरी कोमला नाझीम किझीबे हिच्या विरुद्ध 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.

अंतिम सामन्यात पराभवामुळे मारोकामला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, स्पर्धेतील हे तिचे सातवे पदक आहे. मणिपूरच्या या खेळाडूला 5000 डॉलर (जवळजवळ 3.6 लाख रुपये) बक्षीस म्हणून आणि किझीबे हिला 10,000 डॉलर्स (अंदाजे 7.2 लाख रुपये) मिळाले.

दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या 2021 एएसबीसी आशियाई महिला व पुरुष बॉक्सिंग चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात सहावेळा जागतिक विजेती मेरी कोम पराभूत झाली. यासह मेरी कॉमने तिचे विक्रमी सहावे सुवर्णपदक गमावले. 51 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात मेरी कोमचा दोन वेळा विश्वविजेते नाझीम किझीबेने 3-2 असा पराभव केला. या पराभवामुळे मेरी कोमचं आशियाई चँपियनशिपमध्ये सहा सुवर्णपदके जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मेरी कोमने दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकले असून सातव्यांदा आशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेतला.

मेरी कोम आणि लायशराम सरिता देवी यांनी आशियाई चँपियनशिपमध्ये प्रत्येकी पाच सुवर्ण पदके जिंकली आहेत. या महान बॉक्सरने 2003, 2005, 2010, 2012 आणि 2017 स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते, तर 2008 मध्ये आणि यावर्षी रौप्यपदक मिळाले.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment