Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर…

Share Now To Friends!!

रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसांत आढळलेले पाच मृतदेह बार्जमधील बेपत्ता व्यक्तींचे असल्याचा अंदाज
मागील दोन दिवसात रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग आणि मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर हे मृतदेह आढळून आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

राज्यात शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी, 26,133 नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे.  दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.  आज 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.

मोह मायाची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे, अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी
मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी या नावाने प्रचलित आहे. यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी असे म्हणतात. म्हणजे आज एकादशी आहे. द्वादशीही आहे. आणि त्रयोदशीही आहे. अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी ही काल सकाळी सव्वानऊ वाजता सुरु झाली. याला वारकरी संप्रदायात स्मार्त एकादशी म्हणतात. ही एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीनं भागवत एकादशी म्हणतात. त्यामुळे आज वारकरी संप्रदाय या मोहिनी एकादशीचे व्रत करीत असतो.

कोरोनानंतर काळ्या बुरशीचा कहर, 14 राज्यांत साथरोग म्हणून जाहीर; कोणत्या राज्यात किती केसेस?
एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना आता देशासमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 14 राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment