Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर…

Share Now To Friends!!

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 डिस्चार्ज
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आज 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 इतकी झाली आहे. आज 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 163 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. 

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हायकोर्टात बिनशर्त माफीनामा
राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. औरंगाबादमधील जयेश इन्फ्रा या कंपनीशी संबंधित जमीन महसुलाच्या संदर्भात मंत्रिमहोदयांनी दिलेले आदेश हायकोर्टाने रद्द केले आहेत. तसेच याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना नोटीस जारी करत आपल्या कार्यकक्षेबाहेर दिलेल्या बेकायदेशीर आदेशांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. यावर उत्तर देताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हायकोर्टात आपला बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. तसेच भविष्यात असे निर्देश पुन्हा देताना काळजी घेण्याचंही आश्वासन दिलं आहे. हायकोर्टानं याप्रकरणी दिलेले निर्देश का पाळले नाहीत? म्हणून महसूल विभागाचे सचिव, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी आणि औरंगाबाद ग्रामीण विभागाचे तहसिलदार यांनाही हायकोर्टानं नोटीस जारी करत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

शेगाव दर्शन पॅटर्न पंढरपूर मंदिरात राबविण्यात यावा, विश्व वारकरी सेनेची मागणी
पांडुरंगाच्या दर्शनाची आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे. पण जर शेगाव दर्शन पॅटर्न हा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू करावा व भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास देऊन दर्शन द्यावे आज सरकारने विचार केला तर पूर्ण महिन्यात कमीत कमी एक लाख पन्नास हजार भाविक दर्शन घेऊ शकतील त्यामुळे पंढरपूर येथे शेगाव दर्शन पॅटर्न राबविण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.

न्यूझीलँड कसोटीचा बादशाह! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
WTC 2021, 2 Innings Highlight: न्यूझीलँड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.  भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दोन डावांमध्ये सात विकेट घेणाऱ्या कायले जेमिसनला सामनावीराचा खिताब देण्यात आला. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment