Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Share Now To Friends!!

राज्यात शुक्रवारी 9,677 नवीन कोरोनाबाधित तर 10,138 डिस्चार्ज

राज्यात काल (25 जून) 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. काल 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.94 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल

राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम तर काँग्रेसचं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाचं खापर एकमेकांवर फोडलं जात असून आज 26 जून रोजी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम आंदोलन आहे तर काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment