Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर तर 3,874 जणांचा मृत्यू

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 2,76,110 रुग्णांची भर पडली असून एकाच दिवसात 3874 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 3,69,077 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 96,841 ने कमी झाली आहे. त्या आधी मंगळवारी कोरोनाचे 2.67  लाख नवीन रुग्ण सापडले होते. 

बुधवार 19 मेपर्यंत, देशात 18 कोटी 70 लाख 9 हजार 792 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. बुधवारी एकाच दिवसात देशात 11 लाख 66 हजार 90 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. आतापर्यंत देशात 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी देशात 20 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 57 लाख 72 हजार 440
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 23 लाख 55 हजार 440
  • एकूण सक्रिय रुग्ण : 31 लाख 29 हजार 878
  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 87 हजार 112

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.11 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 86 टक्के आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 13 टक्के झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर मृतांच्या संख्येत भारताचा अमेरिका, ब्राझिलनंतर तिसरा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्रातली स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  91 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment