Coronavirus | प्राण्यांमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा WHO चा अहवाल

Share Now To Friends!!

Coronavirus : कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. 

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचं कारण शोधण्यासाठी डब्ल्यूएचओमधील काही अधिकारी वुहान शहरात गेले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं की, कोरोना वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरल्याची शक्यता आहे.

अहवालात संशोधकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे काही सिनेरियो सांगितले आहेत. त्यांनी अहवाल असा निष्कर्ष काढला की हा विषाणू वटवाघळांपासून दुसर्‍या प्राण्यांमार्फत मानवांमध्ये पसरला. वटवाघळांपासून मानवांमध्ये व्हायरस पसरण्याची शक्यता फार कमी आहे. यासह, व्हायरस “कोल्ड-चेन” खाद्यपदार्थाद्वारे पसरू शकतो, परंतु याची शक्यता कमीच आहे. 

अहवाल प्रसिद्ध होण्यास उशीर झाल्याने प्रश्न उपस्थित

विशेष म्हणजे हा अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे. यामुळे कोरोनाच्या फैलावाच्या दोषातून चीनला वाचवण्यासाठी कोणतेही निष्कर्ष बदलण्याचा प्रयत्न केला होता का? असा प्रश्न निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सांगितले होतं की, पुढील काही दिवसांत हा अहवाल प्रसिद्ध होईल अशी त्यांना आशा आहे. एपी या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हा स्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट मिळाला. दरम्यान, नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पत्रकार परिषदेत सिंघुआ विद्यापीठातील चिनी वैज्ञानिक लियांग वानियान म्हणाले होते की, “SARS-CoV-2 वटवाघुळ आणि खवल्या मांजरांमध्ये आढळतो. कदाचित कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण हेच असू शकतात कारण कोरोना व्हायरस आणि SARS मध्ये साम्य आहे. मात्र या प्रजातींमध्ये अद्याप SARS-CoV-2 चा प्रत्यक्ष संबंध आढळलेला नाही.आमचे प्राथमिक निष्कर्ष सांगतात की, एका इंटरमेडिएट होस्ट प्रजातीच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यास आणि अधिक ठराविक संशोधनाची आवश्यक आहे. निष्कर्षानुसार, प्रयोगशाळेतून कोरोना विषाणाचा प्रसार झाल्याची दावा योग्य नाही.

वुहानमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

जगातील कोरोनाबाधित रुग्ण पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्येच डिसेंबर 2019 मध्ये सापडला होता. यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी वुहानमधल्या बायो लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. याशिवाय चीनच्या वेट मार्केटमधूनही कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचं म्हटलं होतं.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment