Deepali Chavan suicide case : दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

Share Now To Friends!!

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक केली आहे.  दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो वार्तालाप झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. 

यामध्ये शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नाही. आपली ज्यूनियर अधिकारी आहे म्हणून कसेही बोलायचं पातळी सोडून बोलायचं आणि यामध्ये दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण कॉलमध्ये दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत  तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत आहेत. 

आत्महत्या करण्यापूर्वी सिंघम लेडी दीपाली चव्हाण यांनी आपल्या तक्रार अर्जात काय लिहलं होतं?

शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी
दरम्यान आज वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच  DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं गेलं. यावेळी  न्यायालयाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

Deepali Chavan यांना मदत करता न आल्याची सल; खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्यावर आरोप
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  ही सुसाईड नोट अर्थात चव्हाण यांनी  अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून दिलं आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment