Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या ‘ममी’चं गूढ उलघडणार

Share Now To Friends!!

रोम : इजिप्तचे पिरॅमिड्स आणि त्यातील ममी म्हणजे एक प्रकारचं गूढच आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवून मेलेल्या व्यक्तीची ममी म्हणजे प्रेत कपड्यामध्ये गुंडाळून त्या पिरॅमिड्समध्ये ठेवलं जायचं. सोबत विविध अत्तरं, सुंगधी वस्तू, फळं आणि त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी ठेवल्या जायच्या. एक-एक ममी म्हणजे रहस्यच आहे. अशाच एका तीन हजार वर्षांपूर्वीच्या ममीचे CT scan तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इटलीतील हा प्रयोग ऐतिहासिक संशोधानाचा एक भाग असून त्यामुळे ममी संबंधी रहस्यांचा मोठा खजाना उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इटलीमध्ये जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका धर्मगुरुचे पिरॅमिड बांधण्यात आलं होतं. त्या पिरॅमिडमधील ममीला बाहेर काढून नंतर ते बर्गामो शहरातील सिव्हिक आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये (Civic Archaeological Museum) जतन करुन ठेवण्यात आलं होतं. आता त्या ममीवर संशोधन सुरु असून मिलान शहरातील पॉलिक्लिनिको हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर तीन दिवसांपूर्वी CT scan तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर इटलीतील हजारो वर्षांपूर्वीच्या या ममी स्वत: एक बायोलॉजिकल म्युझियम म्हणजे जैविक संग्रहालय आहेत. त्यावर संशोधन करेल तितकं कमी असून काळाप्रमाणे त्यातील गूढता वाढतच जात आहे असं या ममी रिसर्च प्रोजेक्टच्या प्रमुख सबिना माल्गोरा म्हणतात.

ज्या दगडी शवपेटीत (sarcophagu) या ममीचं जतन करण्यात आलं होतं त्यावर कोरलेल्या माहितीनुसार, हे प्रेत अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका धर्मगुरुचं असून ते इसवी सन पूर्व 900 ते इसवी सन पूर्व 800 या काळातील आहे. ‘अंखेखोन्सु देवता जिवंत आहे’ असं पाचवेळा त्या शवपेटीवर कोरण्यात आलं आहे.

या ममीचे CT scan केल्याने तिच्या जीवन आणि मृत्यूसंबंधी माहिती तसंच त्याला पिरॅमिडमध्ये ठेवण्यापूर्वी कपड्यात गुंडाळून ठेवताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता याचा उलघडा होईल असं या संशोधकांना वाटतंय.

आधुनिक वैद्यकीय संशोधनासाठी प्राचीन रोग आणि जखमांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. या सीटी स्कॅनच्या माध्यमातून आपण कर्करोगाचा किंवा भूतकाळाचा धमनीशास्त्राचा अभ्यास करु शकतो आणि हे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते असं या ममी रिसर्च प्रोजेक्टच्या प्रमुख सबिना माल्गोरा म्हणाल्या.

(संदर्भ – Reuters)

महत्वाच्या बातम्या :

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment