Gionee Max Pro आज लॉन्च होणार, 6000mAh ची दमदार बॅटरी

Share Now To Friends!!

Gionee Max Pro :चिनी स्मार्टफोन कंपनी जिओनी (Gionee) आज आपला नवीन स्मार्टफोन जिओनी मॅक्स प्रो (Gionee Max pro)भारतात लाँच करणार आहे. हा फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या जिओनी मॅक्सचा सक्सेसर आहे, असं बोललं जात आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर हा फोन लॉन्च होईल. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. तीन रंगांच्या पर्यायांसह फोन बाजारात मिळणार आहे.

काय आहेत फोनची स्पेसिफिकेशन?

मीडिया रिपोर्टनुसार, जियोनी मॅक्स प्रो स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासह, फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी दिली जाईल. यात 6,000mAh ची मोठी बॅटरी असेल. तसेच, सेल्फीसाठी व्ही-आकाराची नॉच मिळेल.

मोबाईलवर DND सक्रिय करा, अनावश्यक कॉल आणि SMS पासून मुक्त व्हा

तीन रंगांचे पर्याय उपलब्ध

या स्मार्टफोनच्या डिझाईनबद्दल फारसे काही सांगितलं गेलेलं नाही. टीझर पेजवरुन हे समजतंय की, फोन ब्लू करल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. यासह, फोनच्या प्रोसेसर आणि कॅमेर्‍याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. फोनच्या किंमतीबद्दल काहीही सांगितले गेले नाही. मात्र अहवालानुसार हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे.

WhatsApp वर म्युट व्हिडीओ पाठवणं शक्य; युजर्ससाठी खास फिचर

रेडमी 9 पॉवर शी होणार स्पर्धा

जिओनी मॅक्स प्रो भारतीय बाजारात रेडमी 9 पॉवरशी ( Redmi 9 Power) स्पर्धा करू शकतो. रेडमीच्या फोनमध्ये 6.53-इंचाचा फुल-एचडी + डॉट नॉच डिस्प्ले आहे. रेडमी 9 पॉवर लेटेस्ट एमआययूआय 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल नॅनो सिम पोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, ड्युअल-बँड WiFi, ब्लूटूथ व्ही 5.0, GPS, USB type-C, आणि 3.5 mm हेडफोन जॅक सारखी वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. या फोनमध्ये सेल्फीजसाठी 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment