Health Tips : योग्य आहार आणि निद्रा हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

Share Now To Friends!!

नागपूर : आजच्या काळात माणसाने स्वतःला कामाच्या विळख्यात जखडले आहे. त्यामुळे माणसाला वेळी अवेळी निद्रा, वेळी अवेळी आहार घेण्याची सवय लागली आहे जे त्याच्या प्रकृतीकरिता अत्यंत हानिकारक आहे.

गेल्या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोविड-19 महामारीशी झुंज करतो आहे. या महामारीत बऱ्याच कुटुंबांनी आपले सखे सोयरे गमावले. मोठ्या संख्येनं घरे उद्ध्वस्त झाली. भविष्यात असे परत घडू नये म्हणून ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ सुनील जोशी यांनी उत्तम आणि निरोगी आयुष्याकरिता काही मार्गदर्शन केले आहे. ह्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे योग्य आहार आणि निद्रा.    

पण ह्यासाठी योग्य दिनचर्या असणे गरजेचे असल्याचे डॉक्टर जोशी ह्यांचे म्हणणे आहे. डॉ जोशी सांगतात की सकाळी शक्य तितक्या लवकर झोपून उठणे, कमीत कमी पंधरा मिनिटे ध्यान करणे, आवडेल तो व्यायाम करणे, भूक लागली असल्यास हलका नाश्ता करणे हे पहिले पाऊल. आयुर्वेद मुळात नाश्ता करण्यास सांगत नाही. भारतात नाश्त्याची पद्धत ही ब्रिटिशांनी रूजू केली आणि आता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, असे ते म्हणतात. आयुर्वेद हे सकाळचे जेवण आणि सायंकाळचे जेवण याच बाबींवर भर देतं. जेवताना अन्न हे सदैव ताजं, कोमट असायला हवं. सोबतच मात्रावत असावे. अर्थात ते मात्रेबाहेर खाल्यास पचन क्रियेला त्रास होऊ शकतो. 

डॉक्टर जोशी म्हणतात की आहार किती असावा त्याचबरोबर तो कसा असावा  हेही महत्वाचे आहे. जेवतांना स्निग्ध पदार्थ अर्थात तूप किंवा तेलही खावे. आयुर्वेद जास्त प्रमाणात तूपावर भर देण्यास सांगतं कारण तूप हे पचनक्रियेची शक्ती वाढवण्यास मदत करतं. जेवल्यानंतर काही वेळाने पाणी प्यावे. लगेच अगदी भरभरून पाणी प्यायल्यास पोटात त्रास होतो आणि म्हणून खाल्लेले अन्न ही आपल्या अंगी लागत नाही.

यकृत आणि आतडे हे मानवी शरीरातील पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. पोषक आहार पोटात गेला तर शरीरातील आतडे उत्तमरित्या काम करतील, त्यामुळे आपोआपच रोगप्रतिकारशक्ती वाढेल. या कारणाने माणसाला कुठल्याही प्रकारच्या इम्यूनीटी बुस्टर औषधांचे सेवन करायची गरज राहणार नाही, असे मत डॉक्टर जोशी मांडतात. सोबतच आवळा, गुळ, आलं, हळद व असेच दीर्घ काळापर्यंत टिकणारे पदार्थ माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि ती दीर्घ काळापर्यंत टिकवण्यास मदत करते.

मानवी शरीराचे अस्तित्व हे हाडे, बोन मॅरो, रक्त, स्नायू, प्लाझ्मा, इत्यादी धातूंवर निर्भर असतं. जर हे धातू माणसाच्या शरीराबाहेर काढले तर माणसाचं अस्तित्व संपतं. हे अवयव मानवी शरीरात एक महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून यांना धातूंची उपमा दिल्या गेली आहे.

जर माणसाचा प्लाझ्मा हा चांगला असेल, तर त्याचा रसधातू चांगला असतो. त्यामुळे माणूस तेजस्वी दिसतो,अशा अनेक बाबी डॉ सुनील जोशी यांनी सांगितल्या. मग हा प्लाझ्मा चांगला कसा करायचा ह्या प्रशनाचेही उत्तर डॉक्टर सुनील जोशी ह्यांनी दिले. शरीराला सतत “हायड्रेटेड’ ठेवावे आणि पचन योग्य ठेवावे. त्यासाठी मेटॅबलॉसीम चांगले पाहिजे.

Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर व्हायरसपासून तुम्ही किती दिवस सुरक्षित राहाल?

डॉक्टर जोशी  म्हणतात, “आयुर्वेदात सुवर्ण वापरतात अशी समजूत आहे. लोक घाबरतात. त्यांना वाटतं कि आयुर्वेदात मेटल आहे. आम्ही मेटल नाही वापरत.  त्या काळात जेव्हा वैज्ञानिकांनी चांदी, तांबे, सुवर्ण ह्यावर विचार केला तेव्हा लक्षात आले कि चांदी, तांबे काळे पडते, पण सुवर्ण मात्र वर्षानुवर्षे तसेच राहते. त्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि  मग सूक्ष्म राख म्हणजे सुवर्ण भस्म वापरल्या जाते. हे व्यक्तीच्या धातूंना पतित होऊ देत नाही.  वय होणे म्हणजे सुरकुत्या, शरीर आणि प्लाझ्मा आकुंचित होणे. प्लाझ्मा चांगला असेल तर हे सगळे विकार कमी होतात. व्यक्तीचा वर्ण, ‘ऑरा’ तेजस्वी राहतो. आयुर्वेदाने  शब्द दिला आहे की, ज्याचा रसधातू चांगला त्याच्या बाकी धांतूंचे सुद्धा पालन पोषण चांगले होते. अशा व्यक्तीला १०० वर्षांचे दिर्घायुष्य मिळते असे शरद संहितेत सांगितले आहे, असे डॉक्टर जोशी म्हणतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment