Japan | वाढत्या आत्महत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानमध्ये आता ‘मिनिस्टर ऑफ लोनलिनेस’

Share Now To Friends!!

टोक्यो: कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी जपानमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. खासकरुन महिलांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी जपानने स्वतंत्र मंत्रालयाची निर्मीती केली असून या खात्याला ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलिनेस’ (Minister of Loneliness) असं नाव दिलं आहे.

जपानमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांपेक्षाही आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं. त्यामुळे जपानच्या सरकारमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. जपानच्या लोकांमधील वाढत चाललेला एकाकीपणा आणि त्यांचे समाजापासून असलेले विलगीकरण दूर करण्यासाठी जपानच्या सरकारने मिनिस्ट्री ऑफ लोनलिनेस या मंत्रालयाची निर्मिती केलीय.

जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी तेत्सुशी साकामोटो यांच्याकडे या नव्या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. तेत्सुशी साकामोटो यांच्याकडे याआधी जपानचा घटता जन्मदर वाढवणे आणि जपानच्या लोकांचे एकाकीपणा दूर करण्यासाठी धोरणं आखण्याची जबाबदारी होती.

Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह 7 जणांना पद्मविभूषण

जपानच्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. कोरोना काळात ज्या आत्महत्या झाल्या त्या गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक होत्या असं सरकारचा एक अहवाल सांगतोय. त्यामुळे हे नागरिक आत्महत्या का करत आहेत आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवण्यात येतील हे पाहण्याची जबाबदारी या नव्या मंत्रालयावर असेल.

ऑक्टोबर 2020 या एका महिन्यात जपानमध्ये 1756 इतके मृत्यू हे कोरोनामुळे झाले होते तर आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या ही त्यापेक्षा जास्त म्हणजे 2153 इतकी होती. त्यामध्ये 879 इतक्या महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. 2019 च्या तुलनेत महिलांच्या आत्महत्येमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जपानच्या नॅशनल पॉलिसी एजन्सीच्या एका अहवालामध्ये सांगण्यात आलंय की एकाकीपणामुळे नागरिकांत हर्ट अटॅक, स्मृतीभंश तसेच इतरही रोग होत आहेत.

Japan PM Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे दिला पदाचा राजीनामा

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment