Jeff Bezos : अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 20 जुलैला अंतराळ प्रवास करणार

Share Now To Friends!!

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांमध्ये सहभागी उद्योगपती जेफ बेजोस आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस म्हणाले की, त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेफर्ड’ स्पेशशिपवर असणार आहेत. 20 जुलै रोजी हे अंतराळ यान उड्डाण भरणार आहे. या यानातून टेक्सासमधून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे. तसेच 20 जुलै रोजी अपोलो-11 चंद्रावर पोहोचण्याचा वर्धापन दिन देखील साजरा केला जातो.

बेजोस यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांना इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अॅमेझॉनचं सीईओ पद सोडण्याची इच्छा आहे.

बेजोस यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं की, "पृथ्वीला अंतराळातून पाहणं, तुम्हाला बदलून टाकतं. या ग्रहासोबतचं नातं तुमच्यासोबत बदलून टाकतो. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यात करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे."

न्यू शेफर्ड यानमध्ये सीटसाठी लिलावाची बोली शनिवारी संपली. विजेत्या बोलीची किंमत जवळपास 28 लाख डॉलर आहे. ज्यामध्ये 143 देशांतील 6000 हून अधिक लोकांचा सहभाग होता. या लिलावाच्या बोलीतून मिळालेली रक्कम ब्लू ओरिजन फाउंडेशनला दान दिलं जाईल. ज्याचा उपयोग भविष्यात अंतराळातील संशोधनासाठी करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Harry Meghan Welcome Baby Girl: ब्रिटनच्या राजघराण्यात नवी पाहुणी; प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल यांना कन्यारत्न

नायजेरियात Twitter वर अनिश्चित काळासाठी बंदी, राष्ट्रपतींचे ट्वीट डिलिट केल्याचा परिणाम भोवला

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment