Jio New Prepaid Plans: जिओचे नवीन 5 ‘नो डेली डेटा लिमिट’ प्लान; 127 रुपयांपासून सुरु

Share Now To Friends!!

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) शुक्रवारी त्यांचा नवीन ‘जियो फ्रीडम’ प्लान लॉन्च केला आहे.  यामध्ये नवीन पाच ‘नो डेली लिमिट’ प्लान देण्यात आले आहेत. रिलायन्स जिओच्या वेबसाईवर याची यादी टाकण्यात आली आहे. यामध्ये 15 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लानसाठी ग्राहकांना 127 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 12 जीबी डेटा नो डेली लिमिट बेसिसवर देण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त कंपनीने 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस आणि 365 दिवसांचा प्लानही लॉन्च केला आहे. दररोजची मर्यादा न ठेवता या पाच प्लान्सद्वारे यूजर्सना अधिक पर्याय उपलब्ध होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

डेली डेटा लिमिट नसल्यामुळे जास्त डेटा वापरणारे यूजर्स बिनदिक्कत डेटा वापरु शकतात. यासह या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या  प्लान्समध्ये  जियो टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज इत्यादी अॅप्सचाही वापर करता येणार आहे. नवीन प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 30 दिवसांची असेल असे सूत्रांनी सांगितले. पूर्वीच्या लोकप्रिय प्लान्सची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.  वॅलिडिटी 30 दिवसांची झाल्याने रिचार्ज करण्याची तारीख लक्षात ठेवण्यासाठीही जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

रिलायन्स जिओच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 15 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लानसाठी ग्राहकांना 127 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 12 जीबी डेटा नो डेली लिमिट बेसिसवर देण्यात येत आहे. 30 दिवसांच्या प्लानसाठी 247 रुपये मोजावे लागतील. यात 25 जीबी डेटा मिळेल. 60 दिवसांच्या प्लानसाठी 447 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 50 जीबी डेटा मिळेल. 90 दिवसांच्या प्लानसाठई 597 रुपये मोजावे लागतील. यात 75 जीबी डेटा मिळेल.  तर 365 दिवसांच्या प्लानसाठी 2397 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 365 जीबी डेटा मिळेल.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment