Kalyan Crime : 100 हुन अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद; कल्याण खडकपाडा पोलिसांची कारवाई

Share Now To Friends!!

कल्याण : कल्याण शहरासह महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर सोनसाखळी चोरीचे 100 हुन अधिक गुन्हे दाखल असलेला आणि वसई पोलिसांवर हल्ल्याचा प्लान करणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हैदर तहजीब इराणी असं या चोरट्याचं नाव असून कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून त्याला पकडण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईट चोरट्याला पोलिसांनी सापळा रचत अटक केली. सर्वच स्तरांतून पोलिसांच्या या खडतर कामगिरीमुळेचे कौतुक होत आहे. हैदर या इराणी वस्तीतील चोरट्याचा नेता असून त्याचे अनुकरण या वस्तीत केले जात होते.

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कल्याण नजीकच्या आंबिवलीच्या इराणी वस्तीत छापा टाकून सराईत गुन्हेगार हैदर तहजीब इराणी याला अटक केली आहे. हैदरच्या विरोधात मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यात कल्याण डोंबिवलीत 25,  मुंबईत 30, गुन्ह्यांची नोंद असून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकत्रित  गुन्ह्याची संख्या 100 हून अधिक असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली.

दरम्यान, इराणी वस्तीत लपलेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी 2 मार्च 2021 रोजी इराणी वस्तीत आलेल्या वसई पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून आरोपीला पळून जाण्यात मदत करण्यात आली होती. या हल्ल्याचा मास्टर माईंड हैदर असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला पळवून नेतानाचे हैदरचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले होते. या भागांतील चोरट्याचा नेता अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे तो पकडला गेल्याने गुन्हेगारी काही प्रमाणात तरी आटोक्यात येईल, तसेच या भागांतील चोरीच्या घटनांना काही प्रमाणात चाप बसेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लातूरमध्ये वांग्याची भाजी केली नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न

Nagpur : ‘आयेगी याद तुम्हे मेरी वफाये…’अपहरण करुन हत्या झालेल्या 16 वर्षीय राज पांडेचा व्हिडीओ व्हायरल

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment