Kangana Ranaut Petition : पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका, प्राधिकरणाकडून Passport नूतनीकरणावर आक्षेप

Share Now To Friends!!

मुंबई : पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगना रनौतनं (Kangana Ranaut Passport Issue) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) वांद्रे पोलीस स्थानकांत कंगनाविरोधात ‘देशद्रोह’ प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाकडून कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी हायकोर्टानं कंगनाला सध्या अटकेपासून दिलासा दिलेला आहे. त्यामुळे हायकोर्टानं पासपोर्ट प्राधिकरणाला आपल्या पासपोर्टचं नूतनीकरण करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी कंगनानं या याचिकेतून केली आहे.

Kangana Ranaut : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंगनाच्या ‘धाकड’चं उर्वरित चित्रिकरण हंगेरीत

‘धाकड’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी कंगनाला 15 जून ते 30 ऑगस्ट हंगेरीला रवाना व्हायचंय. मात्र तिचा पासपोर्ट सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असल्यानं तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात अडचणी येत आहेत. परदेशवारीसाठी परत येण्याच्या तारखेपासून कोणत्याही व्यक्तीची पासपोर्ट हा किमान सहा महिने वैध असणं आवश्यक असतं. अन्यथा त्या व्यक्तीला परदेशी जाण्याची परवानगी मिळत नाही. कंगनाची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे त्यामुळे चित्रपटाचं उर्वरीत चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी कंगनाला तातडीनं ही परदेशवारी करणं आवश्यक असल्यानं तिनं कोर्टाला सांगितलं. मंगळवारी कंगनाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी अपेक्षित आहे.

बलात्काराच्या आरोपात कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकात अटक

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुनावर अली सय्यद या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरनं कंगनाविरोधात तक्रार केली होती. सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून मुंबई पोलिसांत दाखल झालेल्या या तक्रारीवरून वांद्रे पोलीस स्थानकांत कंगनाविरोधात आयपीसी कलम 153(अ) अंतर्गत  वर्णद्वेषी टिप्पण करून समाजात जातीय तेढ निर्माण करणं, 295(अ) अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना दुखावणं आणि 124 (अ) अंतर्गत देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तसेच हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधातही कंगनानं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिका प्रलंबित असून हायकोर्टानं कंगनाला तूर्तास अटकेपासून दिलासा दिलेला आहे. 

 

 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment