Maharashtra CM Meeting : कोरोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांशी चर्चा, सहकार्याचं आवाहन

Share Now To Friends!!

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोन करुन चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन संवाद साधला असल्याचीही माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. 

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे की, “राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा 

राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती पाहता काल मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्यातील कोरोना स्थिती पाहता कडक निर्बंध लावावे लागतील याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार जे निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितलं आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment