Maharashtra Corona Cases : मोठा दिलासा…! राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, आज 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज

Share Now To Friends!!

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,732 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात आज एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आजपर्यंत एकूण 56,54,003 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.55 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 200 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,82,15,492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,17,121 (15.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,49,251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,997 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला.धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानं आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्यानं धारावीनं कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.सोमवारी (14 जून) आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत.  मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बातमीच आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 

28 जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही 

सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 28 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्हा, ठाणे शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, पालघर, वसई विरार शहर, मालेगाव शहर, अहमदनगर शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव शहर, पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर शहर, जालना जिल्हा, परभणी शहर, लातूर शहर, लातूर जिल्हा, नांदेड शहर, अमरावती शहर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद आजच्या सरकारी आकडेवारीत नाही.  . 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment