Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Share Now To Friends!!

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 10 हजार 567  कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आजपर्यंत एकूण 56,79,746 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.7 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment